पाटगाव येथे दुचाकीचा भीषण अपघात; सुप्रो टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक; दोन जण जखमी
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ आज शुक्रवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरूणी जखमी झाली असून त्यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दुचाकीस्वार हा भरधाव वेगाने रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने जात होता असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.पाटगाव येथील गोपाळवाडीत जाण्यासाठी टेम्पो वळत असत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच देवरूखचे पोलीस हे. काँ. सचिन कामेरकर, पो. काँ. सचिन लगारे, महिला पो. हे. काँ. आर्या वेलवणकर व महिला पो. काँ. रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
Comments are closed.