दापोलीत दोन पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल, दापोलीतील बालिका ,युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अवघ्या अडीच महिन्यात सहा पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने आणि आरोपी जामिनावर सुटून मजा करीत असल्याने दापोलीतील बालिका, युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील एका 16 वर्षे 11 महिने 25 दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीशी अदनान लियाकत कोळथरकर (40) याने ओळख करून घेतली व तिच्याशी फेब्रुवारी 2026 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी काल 09 सप्टेंबर रोजी दापोली पोलीस स्थानकात दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित अदनान लियाकत कोळथरकर याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(1),(2) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.

तर दुसऱ्या प्रकरणात 08 वर्षे 4 महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी 1 सप्टेंबर 26 रोजी सायंकाळी साडेसात चे सुमारास या पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून व ती बेडवर एकटीच अभ्यास करत असताना संशयित प्रमोद भिकू लोवरे यांनी तेथे येऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. संशयित प्रमोद भिकू लोवरे याच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात भारतीत न्याय संहितेच्या कलम 75(2) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.

सर्व आरोपींवरील गुन्हे सिद्ध करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तरच कायद्याचा धाक राहील अशी प्रतिक्रिया या पुन्हा घडलेल्या दोन घटनाानंतर नागरिकांमधून उमटत आहेत.

Comments are closed.