विनाअडथळा वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी काय करायचं? ‘या’ चार गोष्टी ठरतील फायदेशीर


मुंबई : अनेकदा पैशांची आवश्यकता असते तेव्हा काही जणांना मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घेण्यात किंवा मागण्यात कमीपणा वाटतो, अशावेळी लोकांना वैयक्तिक कर्जाचा पर्याय सोपा ठरतो. गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक कर्ज वितरणाची प्रक्रिया सोपी झाली आहे. काही कंपन्या वैयक्तिक कर्ज लगेचच देतात मात्र त्यांचा व्याजदर अधिक असतो. त्याशिवाय नियम आणि अटी देखील त्यांच्या बाजूनं असतात. यासाठी फिनटेक कंपन्यांऐवजी मोठ्या सरकारी बँका किंवा किंवा खासगी बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेणं योग्य ठरतं. तुम्हाला मोठ्या बँकांकडून किंवा एनबीएफसीकडून तातडीनं वैयक्तिक कर्ज हवं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

चांगला क्रेडिट स्कोअर  (Good Credit Score for Personal Loan)

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट चांगला क्रेडिट स्कोअर असावा. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्ज लवकर मिळू शकतं. वेळोवेळी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासायला हवा. अनेकदा काही कारणांमुळंक्रेडिट स्कोअर कमी राहतो, याची कर्ज ज्याला घ्यायचं आहे त्याला माहिती नसतं. क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासल्यास त्यातील चुकांबद्दल क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे तक्रार करता येते.

नियमित

बँका आणि एनबीएफसी अशा लोकांना वैयक्तिक कर्ज देण्यात उत्सुक असतात ज्यांच्याकडे उत्पन्नाचे नियमित स्त्रोत आहेत.  नोकरी करणाऱ्या लोकांचे अर्ज लगेचच मंजूर होतात. कारण बँकांना माहिती असतं  प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्यांच्या खात्यात पगार जमा होतो. यांना कर्जाची परतफेड करण्यात अडचण येणार नाही.

कमी उत्पन्न आणि कर्ज प्रमाण

जर तुमचं उत्पन्न आणि कर्जाचं प्रमाण कमी असेल तर वैयक्तिक कर्ज घेण्यात अडचण येत नाही. बँक आणि एनबीएफसी अशा लोकांना कर्ज देण्यास उत्सुक असते. म्हणजेच ज्यांच्यावर कर्जाचा बोजा अधिक नाही त्यांना बँक कर्ज देण्यास तयार असते. उदा. ज्याचा पगार मासिक 1 लाख रुपये असेल आणि त्याचे 40000 रुपये ईएमआय देण्यावर जात असलीत तर त्याचं उत्पन्न आणि कर्ज यांच्यातील  गुणोत्तर अधिक असेल.

बँकेसोबत चांगले संबंध

बँकेसोबत चांगले संबंध असणं देखील गरजेचं आहे. कोणत्याही एका बँकेसोबत चांगले रिलेशन असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गरजेसाठी एका बँकेवर निर्भर असाल तर बँकेला तुमची आर्थिक स्थिती माहिती असते. कर्ज वेळेवर परत करणाऱ्या ग्राहकांना कर्ज देण्यास बँक उत्सुक असते. त्यामुळं बँकेसोबत चांगले संबंध ठेवावेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.