पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा दादरमध्ये रास्ता रोको

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजीमध्ये भरमसाट दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाईविरोधात काँग्रेसने आज दादर येथील इंडिया बुल्ससमोर  रास्ता रोको आंदोलन केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले तसेच नरेंद्र मोदी सरकार व देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नरेंद्र मोदी हे देशासाठी पनौती – सपकाळ

यावेळी सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून जनतेवर वरवंटा फिरवत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत. पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे असे जर त्यांना वाटत असेल तर जनता भरदुपारी कडक उन्हात पेट्रोल पंपावर काय ऊन खायला रांगा लावत आहेत का, असा सवाल सपकाळ यांनी केला.

Comments are closed.