बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, ‘तो’ खासदार आणि त्यांच्या प
फलटण गुन्हा डॉक्टर मृत्यू: सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Crime Doctor Death) केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून, तिच्या नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (Gopal Badne) याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर (Prashant Bankar) नावाच्या व्यक्तीनेही तिला मानसिक त्रास दिला. आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांकडे तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही, असे नमूद केले आहे. तसेच एक खासदार आणि त्यांच्या पीएचा देखील उल्लेख यात करण्यात आला आहे. या प्रकरणावर आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
सुरेश धस म्हणाले की, ज्या पोलिसांनी या प्रकरणात तक्रार घेतली नाही. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालले पाहिजे, परंतु यासाठी एसआयटी स्थापन झाली पाहिजे. आजच्या दैनिकांमध्ये आरोपी फरार असल्याची बातमी आहे. पोटाला चिमटा घेऊन ऊस तोडून आमचे लोक लेकीबाळीला शिकवतात. त्याचा जर असे लोक गैरफायदा घेणार असतील तर जरब बसली पाहिजे इथून पुढे असे प्रकरण होता कामा नये, असे त्यांनी म्हटले.
Phaltan Crime Doctor Death: जे जबाबदार असतील ते सगळे आरोपी झाले पाहिजे
महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटप्रमाणे आरोपी झालेच पाहिजे. त्याशिवाय महिलेची तक्रार न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळे यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. महिलेच्या वडिलाला केवळ तीन एकर जमीन आहे. त्यावर त्यांनी मुलीला शिकवले आणि बीडचे म्हणून कोणी हिणवत असेल तर ते दुर्दैव आहे. बीडचे लोक बुद्धिमान आणि सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाणारे आहेत, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
Phaltan Crime Doctor Death: ‘तो’ खासदार आणि त्यांच्या पीएला…
सुरेश धस पुढे म्हणाले की, कोण खासदार असतील किंवा त्यांचे पीए दबाव टाकणारे असतील, हे तपासात पुढे येईल, जर तसं आढळून आल्यास त्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या लेकरावर अत्याचार होत होता. त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. क्लार्कपासून सीएसपर्यंत जे जे कोणी जबाबदार असतील ते सर्वच्या सर्व यामध्ये आरोपी झाले पाहिजेत, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडे यांची फेसबुकवर प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील शुक्रवारी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, तसेच ती बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे व दोषींना कडक शासन व्हावे, याबाबत उद्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.