‘त्या वेळचे फोटो, व्हिडिओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत…’, डॉक्टर तरूणीच्या परिवाराच्या भे


बीड: बीडच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर तरूणीने फलटण (Phaltan Doctor Death) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी पीडित (Phaltan Doctor Death) कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मृत डॉक्टर तरूणीने अनेक वेळा तक्रार अर्ज केला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर याची कोणीही दाखल घेतली नाही. त्यामुळे यातील सर्वच दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.(Phaltan Doctor Death) तर या संदर्भात उद्या (सोमवारी, ता २७) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे. सातारा पोलिसांनी पीडित कुटुंबाला जबाब घेण्यासाठी साताऱ्याला न बोलवता बीडमध्ये येऊन त्यांचा जबाब घ्यावा अशी देखील मागणी सुरेश धस (Phaltan Doctor Death) यांनी केली आहे. दरम्यान या आत्महत्या प्रकरणात काही राजकीय लोकांची देखील नावे पुढे येत आहेत. त्यांची ही चौकशी करून ऊसतोड मजुराच्या मुलीला न्याय मिळावा असे धस यांनी म्हटलं आहे.(Phaltan Doctor Death)

Phaltan Doctor death: पोलिसांकडून त्यांच्यावरती दबाव

भाजपा आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं की, हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट असल्याचा सर्टिफिकेट देण्याचा दबाव पोलिसांकडून त्यांच्यावरती करण्यात आलेला होता, जर माझं काही बरं वाईट झालं, तर पोलीसच त्याला जबाबदार राहतील, असं स्टेटमेंट त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार त्या पोलिसाला निलंबित केलं आहे. दोन्ही आरोपींना अटक केल्याचा समोर आलंय. पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली. रात्री उशिरा तो पोलीस आरोपी सरेंडर झाला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्याच खुर्चीवर बसून डॉक्टरांना धमक्या देणे आणि अनफिट असताना फिटचं सर्टिफिकेट द्यायला लावणे, अशी कृत्ये तिथे सुरू होती.

Phaltan Doctor death: तीन वेळा पत्र देऊन सुद्धा कोणताही पाठपुरावा झाला नाही

तेथील पीआय, डीवायएसपीला, डॉक्टर तरूणीने सांगितलं होतं. तेथील एसपींकडे देखील त्या डॉक्टर तरुणीने तक्रार दिलेली होती. या प्रकरणाच्या संबंधी आम्ही उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन यांच्यामध्ये आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता त्यांनी इतर ज्या ज्या वेळी पत्र दिले आहेत, तीन वेळा पत्र देऊन सुद्धा कोणताही पाठपुरावा झाला नाही. कंत्राटी डॉक्टरला किती वेळा पोस्टमार्टम ड्युटी दिली जाते, त्याबाबत देखील नियमावली तपासली जावी. या डॉक्टर तरुणीलाच वारंवार हीच ड्युटी का दिली जात होती याची चौकशी व्हावी. अनफिट असताना देखील फिट असल्याचा सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणलं होतं. त्यांनी वारंवार सांगितलं होतं. डॉक्टर ज्यांच्याकडे तक्रार केली होती, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे या सर्व बाबींची चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे.

Phaltan Doctor death: त्या वेळचे फोटो, व्हिडिओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत…

त्याचबरोबर ज्यावेळी त्या हॉटेलमध्ये डॉक्टर तरूणीने गळफास घेतला त्या वेळचे पोलिसांनी फोटो व्हिडिओ काढले होते ते त्यांच्या परिवाराला देण्यात आलेले किंवा दाखवण्यात आलेले नाहीत. सुसाईड झाल्यानंतर कुटुंबियांना कळवल्यानंतर गळफास घेतलेली मुलगी कोणत्या अधिकाराखाली खाली उतरवली, कुटुंबाला पोस्टमार्टम करण्यासाठी नेल्यावर दाखवलं जातं, हे सगळं संशयस्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रनेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईड करेल का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत ते शंभर टक्के न्याय देतील, असेही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.