डॉक्टर मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या, मग त्यांनी…. प्रशांत बनकरच्या आईच्या दाव्याने नवा
सातारा: सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Phaltan Doctor Death Case) केली. ही घटना गुरुवारी (ता, २३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले (Phaltan Doctor Death Case) आहे. या प्रकरणी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे, बनकरच्या घरी ही डॉक्टर तरूणी वास्तव्यास होती. या प्रकरणी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे, त्याच्या आई-वडिलांनी आणि भावाने तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.
Satara Doctor Case: डॉक्टर तरुणी एक वर्षापासून बनकर यांच्या घरी राहत होती
तर फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या खोलीत डॉक्टर तरूणीचं वास्तव्य होतं. या डॉक्टर तरुणीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रशांत बनकर हा निर्दोष असल्याचा त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे. डॉक्टर तरुणी राहत असलेल्या रूमला सील करण्यात आले आहे. डॉक्टर तरुणी ज्या घरात राहत होती त्या घरातील तरुण प्रशांत बनकर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणात प्रशांत बनकरच्या भावाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी ही गेल्या एक वर्षापासून बनकर यांच्या घरी राहत होती. माझा भाऊ पुण्याला असतो तो खूप कमी वेळा घरी येतो. याचा संपूर्ण तपास व्हावा. तपासात संपूर्ण बाबी समोर येतील. खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते समजेल असं प्रशांत बनकरच्या भावाने म्हटलं आहे.
Satara Doctor Case: गोपाळ बदने याचं नाव देखील आम्ही कधी ऐकलं नाही
तर प्रशांत बनकरच्या आईने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, माझ्या मुलाने त्या डॉक्टर तरुणीला कसलाही त्रास दिलेला नाही. हातावर पेनाने कोणी लिहिलं की डॉक्टर मॅडमनी लिहिलं याचा संपूर्ण तपास व्हावा. आम्हाला शंका आहे. डॉक्टर मॅडमनी आमच्या मुलाचं नाव कसं काय घेतलं. डॉक्टर मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या तो इथे राहत पण नव्हता. तो फक्त शनिवारी रविवारी यायचा आणि कामाचा लोड असल्यामुळे तो इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष देत नव्हता. गोपाळ बदने याचं नाव देखील आम्ही कधी ऐकलं नसल्याचं बनकरच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना बघितलं होतं त्या मला सांगून गेल्या होत्या, काकू मी आधी राहत होते तिथे नाश्ता करण्यासाठी चालले आहे, असं त्यांनी मला सांगितलं. तिथेच त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जेवण केलं होतं मी त्यांना फोन केला होता जेवायला कधी येता म्हणून, तर त्या मला म्हणाल्या दुसऱ्या एका काकूंनी मला जेवायला बोलावलं आहे. त्या गेल्या आठवड्यात जरा टेन्शनमध्ये दिसत होत्या, आम्ही त्यांना स्वतःहून विचारलं तर त्या कधी सांगत नव्हता. काही वेळाने त्या परत आधी सारख्या नॉर्मल असायच्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बनकर परिवाराने केली आहे. तर आपला मुलगा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Satara Doctor Case: गळफास घेण्यापूर्वी तळहातावर लिहिले आत्महत्येचे कारण
गळफास घेण्यापूर्वी तळहातावर डॉक्टर तरूणीने आत्महत्येचे कारण लिहिले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि सखोल तपास केला जाईल, असे सांगितले आहे. हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
Satara Doctor Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गोपाळ बदने निलंबित
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली असून, संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे, असे आदेश पोलिसांना दिले. त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित केले आहे. तो फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.