फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत उज्ज्वल निकमांचं भाष्य, म्हणाले, ‘स्वतःच्या हातावर नोट लिहून स
फलटण: सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Phaltan Doctor Death case) केली. ही घटना गुरुवारी (ता.२३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र (Phaltan Doctor Death case) हादरला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार (Phaltan Doctor Death case) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्यसभा खासदार उज्वल निकम यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं आहे, त्याचबरोबर एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या हातावर नोट लिहून स्वतःला संपवून घेणं ही धक्कादायक बाब आहे असंही निकम म्हणालेत.(Phaltan Doctor Death case)
Phaltan Doctor death: वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं धक्कादायक
फलटणच्या घटनेबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दाखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या हातावर नोट लिहून स्वतःला संपवून घेणं ही धक्कादायक बाब आहे. सातारा पोलीस लवकरच सखोल चौकशी करतील आणि आरोपींविरुद्ध आरोप पत्र दाखल करतील, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
Phaltan Doctor death: फलटण महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा घटनाक्रम
– आत्महत्येला 36 तास उलटून गेले होते आरोपींचा शोध सुरू होता आरोपींचा सुगावा पोलिसांनाच लागत नसल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.
– शनिवारी सकाळी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली.
– त्यानंतर त्याला अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांकडून सात दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
– शनिवारी संध्याकाळी 11च्या सुमारास उपनिरीक्षक गोपाल बदने हे स्वतःहून पोलिसांना शरण आला.
– गोपाल बदने याला वैद्यकीय तपासणीसाठी रात्री दीडच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं.
– यावेळी मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने एबीपी माझा बोलताना म्हटले आहे माझा कोर्टावर आणि कायद्यावर विश्वास आहे पोलीस प्रशासनावर देखील विश्वास आहे असं वक्तव्य गोपाल बदने यांनी केलं त्यानंतर त्यांना फलटण शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.
– आज रविवारी गोपाल बदने याला सकाळी 11 नंतर कोर्टामध्ये पोलीस हजर करतील यामध्ये कोर्ट काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
– महिला डॉक्टर आत्महत्या मधील दोन्हीही मुख्य संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Satara Crime News: नेमकं प्रकरण काय?
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संबंधित महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर महिलेने गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयातवशवविच्छेदनासाठी पाठविला.
आणखी वाचा
Comments are closed.