डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलावून हत्या; सुषमा अंधारेंचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर सनसनाटी आरोप
फलटण डॉक्टर मृत्यू: सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Death) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये एक खासदार आणि त्यांच्या पीएचा देखील उल्लेख यात करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिला डॉक्टरने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? आम्हाला हत्या झाल्याचा संशय आहे. तिची बहिण सांगतेय की ते हस्ताक्षर तिचे नाही. तिने हॉटेलमधे खोली घेणं हेच संशयास्पद आहे. यातील सुसाईड नोट गायब करण्यात आलीय का? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महिला डॉक्टरला त्रास दिला. त्यांची चौकशी झाली पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बीडच्या कामगारांना त्रास दिलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुलींनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय.
Phaltan Doctor Death: सुषमा अंधारेंनी तो व्हिडीओ दाखवला
यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ देखील दाखवला. व्हिडिओतील लोकांनी आत्महत्येपूर्वी रणजित निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत, असं अंधारे म्हणाल्या. मात्र, तो व्हिडिओ सर्व ठिकाणाहून डिलीट करण्यात आला, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
Sushama Andhare on CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लीन चीट गंभीर
दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. तसेच, ‘रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चीट दिली. यावरून सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली क्लीन चीट गंभीर आहे. डॉक्टर महिलेची हॉटेलवर बोलवून हत्या झाली आहे. बनकर, बदनेची नावे टाकून दिशाभूल केली जात आहे का? बीडच्या मुलीची संस्थात्मक हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.