डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा स
फलटण डॉक्टर मृत्यू: फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Death) करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, वैद्यकीय क्षेत्रातही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध राजकीय नेत्यांनी सरकार आणि प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उप नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणावरून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या टीकेची झोड उठवली आहे. आता डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव असल्याचा पुरावाच सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे.
फलटणच्या डॉक्टरांच्या मृत्यूवर सुषमा अंधारे : काय म्हनल्या सुषमाची जमीन?
सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मृत डॉक्टर महिलेवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव येत होते. त्याचा आणखी एक पुरावा. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाचा 12 मार्च 2025 ला निर्घृण खून झाला. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता. डॉक्टर तरुणीने असे करण्यास स्पष्ट नकार दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव येत होते.
त्याचा आणखी एक पुरावा. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाचा 12 मार्च 2025 ला निर्घुण खून झाला. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता..
डॉ. संपदा मुंडे ने असे करण्यास स्पष्ट… pic.twitter.com/pyth3czzTq— सुषमाताई अंधारे (@andharesushama) ३१ ऑक्टोबर २०२५
Sushma Andhare on Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांची राजीनाम्याची मागणी
फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारे यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. अंधारे म्हणाल्या, “राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगाकडून स्पष्टीकरण मागवावे, कारण सध्या हा आयोग राजकीय हेतूने प्रेरित पद्धतीने काम करत आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांची बदनामी करण्याच्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी आम्ही खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे,” असे त्या म्हणाल्या.
Phaltan Doctor Death Case: नेमकं प्रकरण काय?
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.