फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी
सातारा : फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानं प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सरकारी वकील महाले यांनी सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती. तर, आरोपी प्रशांत बनकर यांचे वकील सुनील भोंगळे यांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी, असा देखील युक्तिवाद केलेला होता. यावर न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांच्यासमोर संशयित आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद समोरासमोर झाल्यानंतर संशयित आरोपी प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे
आरोपी प्रशांत बनकर ला अटक करण्यात आली होती त्याला फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण येथे हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून किमान सात दिवसाची कोठडी मागितली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करून 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी केली होती.28 तारखेपर्यंत प्रशांत बनकर ला पोलीस कस्टडी देण्यात आले आहे.
Prashant Bankar : प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक
फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याच लिहिली होत.
गोपाल बदने याचा शोध सुरु
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय बदने याचे काल शेवटचे लोकेशन पंढरपूर होते. तोही बीड परिसरातला असल्याने साताऱ्यावरून बीड कडे जाताना त्याने बहुदा पंढरपूर परिसरात फोन बंद केलेला असावा, अशी माहिती आहे. कालपासून पोलिसांच्या सर्व टीम त्याच्या गाडीसह शोध घेत होते मात्र तो आज अखेर मिळून आलेला नाही. गोपाल बदने याला कधी अटक होणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, मृत डॉक्टर तरुणीच्या चुलत्यानं प्रशांत बनकर हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला आहे. प्रशांत बनकर याला फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.