Photo – शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे…; नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
‘देशातील शिक्षण व्यवस्थेचे अपयश आणि ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे तणावात गेलेल्या सहा ते सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. केवळ ‘नीट’ परीक्षाच नाही, तर ‘सीबीएससी’ व इतर स्पर्धा परीक्षांमधील काढता गोंधळ यांसारख्या प्रकारांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. या प्रकारांची केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्कीकारून शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे; अन्यथा आम्ही देशव्यापी आंदोलन करू,’ असा इशारा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. अभिजित दीपके यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज (11 जून 2026) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी चार वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पुणेकर आंदोलनात सहभागी झाले.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)





Comments are closed.