Photo – शिवसेना भवनात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; आदित्य ठाकरे यांचा नागरिकांशी थेट संवाद
मुंबईतील शिवसेना भवन येथे शिव संचार सेनेच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख, नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून नागरिकांशी थेट संवाद साधला.

या कार्यक्रमाला शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिव संचार सेना अध्यक्ष अखिल चित्रे तसेच प्रमुख मार्गदर्शक आणि सायबर तज्ज्ञ राजेंद्र तावाटे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिरात फिशिंग, हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, ओटीपी स्कॅम आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

डिजिटल सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय याबाबतही माहिती देण्यात आली.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments are closed.