सेप्टिक टँक साफ करताना चार कामगारांचा मृत्यू.

वृत्तसंस्था/ सुरत

गुजरातमध्ये सुरत येथील एका कारखान्यात सेप्टिक टँक साफ करण्यासाठी खाली उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला. विषारी वायूमुळे ते सर्व बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरतमधील खंड बाजार परिसरात ही दुर्घटना घडली. सेप्टिक टँक साफ करताना कामगारांनी सुरक्षा उपकरणे वापरली नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. निमेश विठ्ठलभाई सावलिया (26), विकास कुमार संतोषभाई सोनावणे (24), विजय भिकाभाई अहिरे (24) आणि योगेश नानाभाई जाधव अशी मृतांची नावे आहेत.

Comments are closed.