भाजपने अजित पवारांच्या विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावायला डाव टाकला, पिंपरी चिंचवडमध्ये
Pimpri Chinchwad Election 2026: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मेगाभरती सुरु आहे. त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे याला भाजपने ऑफर दिली होती. ही चर्चा शहरभर रंगलेली असताना, सिध्दार्थ बनसोडे यानेच आपल्याला भाजपकडून थेट ऑफर आल्याची कबुली दिली आहे. परंतु, सिध्दार्थला अशी काही विचारणा झाली नाही, असा दावा अण्णा बनसोडे यांनी केला आहे. त्यामुळं या ऑफरबाबत अण्णा बनसोडे अनभिज्ञ आहेत, असं म्हणावं लागेल. पण यानिमित्ताने पुण्यातील शरद पवारांचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे प्रमाणे अण्णा बनसोडेंच्या मुलाला भाजपने फोडण्याचा प्रयत्न केल्याचं सिध्दार्थच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.
मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. हे समजल्यानंतर मला भाजपसह इतर पक्षांकडून विचारणा झाली, अशी जाहीर कबुली सिध्दार्थ बनसोडे यांनी दिली. पण अजितदादांनी माझ्या वडिलांवर मोठा विश्वास दाखवत, त्यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिले. त्यामुळे आम्ही अजितदादांशी एकनिष्ठ राहू, असे म्हणत आपण भाजपची ऑफर नाकारल्याचा दावा सिद्धार्थने केला आहे. या सगळ्यावर अद्याप अजित पवार किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, भाजपकडून दोस्तीत कुस्तीच्या या प्रयत्नानंतर अजित पवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Shivsena & BJP: पिंपरीत भाजप-शिंदे युतीवर शिक्कामोर्तब, श्रीरंग बारणेंचा दावा
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढच्या काही तासांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, याची घोषणा केली जाणार असल्याचा दावा शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने हा निर्णय झाला आहे. या युतीत आम्ही 30 जागांची मागणी केलीये. मात्र यात तडजोड होईल, कोणतीही रस्सीखेच केली जाणार नाही, असे श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपपेक्षा जास्त जागांची ऑफर दिली तरी ती आम्ही स्वीकारणार नाही. शिवसेनेची भाजपसोबत असणारी पारंपरिक युती पिंपरी पालिकेत कायम ठेवण्याचा आम्ही अंतिम निर्णय केलाय. फक्त आता घोषणेची औपचारिकता बाकी आहे, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला.
आणखी वाचा
पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले….
आणखी वाचा
Comments are closed.