पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 443 उमेदवारांची माघार, कोणत्या भागातून किती उमेदवार रिंगणा
पिंपरी: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (शुक्रवारी ता. २) अखेरचा दिवस होता. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ४४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता एकूण ६९२ उमेदवार निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Mahanagar Palika) मैदानात लढणार आहेत.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध प्रभागांमधून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी मोठ्या प्रमाणावर माघारी नोंदवण्यात आल्या आहेत. ही माघार प्रक्रिया महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडली असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुढील टप्प्यात अंतिम उमेदवारांची यादी, चिन्ह वाटप आणि प्रचार कार्यक्रम आज (३ जानेवारीला) होणार आहे.(Pimpri Chinchwad Mahanagar Palika)
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील
प्रादेशिक कार्यालय –
एकूण उमेदवार – १५७
माघार घेतलेले उमेदवार – ५७
अंतिम उमेदवार – १००
ब क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १७६
माघार घेतलेले उमेदवार – ७०
अंतिम उमेदवार – १०६
प्रादेशिक कार्यालय –
एकूण उमेदवार – १४५
माघार घेतलेले उमेदवार – ५४
अंतिम उमेदवार – ९१
D क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १२४
माघार घेतलेले उमेदवार – ६३
अंतिम उमेदवार – ६१
ई क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – ८६
माघार घेतलेले उमेदवार – ३३
अंतिम उमेदवार – ५३
F क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १४७
माघार घेतलेले उमेदवार – ४३
अंतिम उमेदवार – १०४
C क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १००
माघार घेतलेले उमेदवार – ४०
अंतिम उमेदवार – ६०
प्रादेशिक कार्यालय –
एकूण उमेदवार – २००
माघार घेतलेले उमेदवार – ८३
अंतिम उमेदवार – ११७
एकूण उमेदवार – ११३५
एकूण माघार घेतलेले उमेदवार – ४४३
प्रत्यक्ष उमेदवार – ६९२
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतील चित्र स्पष्ट
एकूण 128 जागांसाठी लढत
भाजप – 125 (पैकी 2 बिनविरोध )
अजित पवार गट – 118 ( 3 ठिकाणी माघार )
शरद पवार गट – 11
शिंदे सेना – 57 ( 8 ठिकाणी माघार )
ठाकरे सेना – 50 ( 4 ठिकाणी माघार )
मनसे – 14 ( 2 ठिकाणी माघार )
काँग्रेस – 49 ( 1 ठिकाणी माघार )
टीप – अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या नमूद आहे. तर कंसातील आकडे हे माघार घेतलेली संख्या आहे.
पिंपरीत फक्त दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढाई! की अजित पवार-श्रीरंग बारणेंची स्वार्थासाठी दिलजमाई?
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना फक्त दोनचं प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली स्वार्थासाठी एकत्र आलेत, अशी जोरदार चर्चा रंगलीये. अजित पवारांनी पार्थचा पराभव करणारे शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणेंचे पुत्र आणि पुतण्यासमोरचे अर्ज समर्थकांना ऐनवेळी माघारी घ्यायला भाग पाडलंय. प्रभाग 24 मधून बारणेंचा पुत्र विश्वजित आणि पुतण्या निलेशला नगरसेवक करण्यासाठी अजित पवारांनी इथं मैत्रीपूर्ण लढायचं ठरवलं. त्याचवेळी श्रीरंग बारणेंनी अजित पवारांच्या कट्टर समर्थकाला नगरसेवक बनवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांचे अर्ज मागे घ्यायला भाग पाडलंय. प्रभाग 28 मधून नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटेंना नगरसेवक करण्यासाठी बारणेंनी इथं मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवल्याचं बोललं जातंय. पण अजित पवार आणि श्रीरंग बारणेंनी उर्वरित प्रभागात कार्यकर्त्यांना एकमेकांच्या विरोधात लढवायचं, एकमेकांमध्ये भिडवायचं. मात्र कुटुंबातील व्यक्ती आणि कट्टर समर्थकांसाठी मैत्रीपूर्ण लढायचं, आता यामागे फक्त अन फक्त स्वार्थचं दडलाय हे न समजण्याइतकं कार्यकर्ते आणि जनता नक्कीच दूध खुळी नाही.
आणखी वाचा
Comments are closed.