गुलाबी टी-शर्ट, वाढलेली दाढी; अशोक खरात कोर्टात स्तब्ध उभा राहिला; न्यायाधीशांनी प्रश्न विचारता
राहाता : नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat Crime News) आज राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. जमीन खरेदी व अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, RCP च्या तुकडीसह मोठ्या पोलिस बंदोबस्तात खरातला (Ashok Kharat Crime News) न्यायालयात हजर करण्यात आलं. राहाता न्यायालयात सरकारी वकील ॲड.गौरव बोर्डे यांच्याकडून युक्तिवाद करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. आरोपींनी कशा पद्धतीने हे व्यवहार केले. एवढी मोठी रक्कम जमीन घेण्यासाठी कुठून आणली. याचा तपास करण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली. तर अशोक खरात नॉमिनी असलेले बरेच खाते विविध पतसंस्थांमध्ये सापडले आहे. बरेच व्यवहार झाले आहे, याचा देखील तपास करायचा आहे असं तपासी अधिकारी आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे, आता कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. (Ashok Kharat Crime News)
Ashok Kharat Crime News: जमीन खरेदी केली तेव्हा पैसे कुठून मिळाले
तर भोंदू अशोक खरात न्यायाधीश यांच्यासमोर खाली मान घालून स्तब्ध उभा. तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे आम्हाला आरोपीची चौकशी करायची आहे. जमीन खरेदी केली तेव्हा पैसे कुठून मिळाले. याचा तपास करायचा आहे. व्याजाचे पैसे कोणी कोणी वाटून घेतले. या गुन्ह्यातील दुसरी आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. तिच्याकडून देखील आणखी माहिती घ्यायची आहे. एकूण चौदा व्यवहार करण्यात आले. त्यात 5 कोटी 52 लाखांचे व्यवहार आहेत, फसवणूक केल्याचा उद्देश स्पष्ट होतो, कल्पना खरात ही त्याची पत्नी असल्याने ती कुठे राहू शकते याबाबत तपास करायचा आहे, खरातला जास्तीत जास्त पोलिस कोठडी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. (Ashok Kharat Crime News)
Ashok Kharat Crime News: भोंदू खरात मान हलवत म्हणाला नाही…
त्याचबरोबर यामध्ये आणखी यात काही लोक सहभागी आहेत का. याची देखील ह्या अशोक खरात याच्याकडून चौकशी करायची आहे. शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात यासाठी कोर्टाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. न्यायाधीश यांच्यासमोर भोंदू खरात याला हजर केलं, शिर्डी पोलिसांच्या वतीने तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव युक्तिवाद करत आहेत,तर न्यायाधीश यांनी भोंदू खरात याला विचारलं काही सांगायचे आहे का? भोंदू खरात मान हलवत म्हणाला नाही.
Ashok Kharat Crime News: खरातच्या वकीलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की…
आरोपी अशोक खरातच्या वकीलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, फिर्यादी जमीन मालकाने गुन्हा दाखल करायला एवढा उशीर का केला. फिर्यादीने अनेक पतसंस्था आणि बँकाकडून कर्ज घेतलं आहे. एकही कर्ज त्यांनी फेडले नाही आणि त्याचे हप्ते भरलेले नाही. आरोपीचे वकील FIR वाचून संपूर्ण व्यवहाराच्या घटनाक्रमाची माहिती कोर्टाला देत आहेत. अशोक खरात यांनी जमीन व्यवहाराची पूर्ण रक्कम फिर्यादी जमीन मालकाला देऊन टाकली आहे. 5 कोटी 52 लाखाला व्यवहार ठरला होता आणि ही रक्कम फिर्यादीच्या खात्यात अशोक खरात याने वर्ग केली आहे. फिर्यादीतील सर्व मजकूर हा बनवला गेलेला वाटतोय खरात यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया फिर्यादी याला विश्वासात घेऊन शिर्डी पोलिसात करण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात रकमेचा परतावा देण्याचं म्हणलं आहे. मग पोलिसांनी सावकारीचे कलम का लावले. फिर्यादी FIR मध्ये म्हणतोय की मी रकमेचा परतावा देणार आहे. शिर्डी पोलिसांना कल्पना खरात मिळून येत नाही म्हणून कल्पना खरात ह्या फरार आहे असं शिर्डी पोलिस म्हणत आहे.
18 मार्च पासून आरोपी अशोक खरात हे SIT पथकाच्या ताब्यात आहे आणि शिर्डी येथे 31 मार्चला गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर कल्पना खरात फरार आहे. त्यामुळे कल्पना खरात ह्या कुठ आहेत हे अशोक खरात हे कसं सांगू शकतात. ते तर गेल्या 18 मार्च पासून कोर्टाच्या ताब्यात आहे, अशा युक्तीवाद खरातच्या वकिलांनी केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.