पीएम किसानचे 2000 येताच व्हाटसअपवरुन मेसेज पाठवून फसवणूक, शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान कसं टाळावं?

अहिलीनगर: केंद्र सरकारकडून 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. देशभरातील 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास विभागाकडून 21500 कोटींपेक्षा अधिक निधी वर्ग करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख 41 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना किती मिळाले?

पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच लाख 41 हजार शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झाला आहे.  जिल्ह्यातील  जवळपास 108 कोटी 33 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी म्हटलं.

पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सतर्क राहावं

सध्या शेतकरी बांधवांना काही व्हाटसअप ग्रुपवरुन पीएम किसान डॉट एपीके, पीएम किसान लिस्ट डॉट एपीके प्राप्त होत आहेत. शेतकरी अजानतेपणी, जे काही मेसेज येत आहेत  त्यावर क्लिक करुन एपीके फाईल डाऊनलोड करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रकमा गायब होत असल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पीएम किसान डॉट एपीके किंवा पीएम किसान लिस्ट डॉट एपीके अशा प्रकारच्या फाईल्स फोनमध्ये डाऊनलोड करु नये, असं सुधाकर बोराळे यांनी म्हटलं.

चुकीच्या प्रवृत्ती व्हाटसअपवरुन कार्यरत आहेत त्यांना बळी पडू नये. शेतकऱ्यांनी गैर प्रकारापासून सतर्क राहावं, असं जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी म्हटलं आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये काही शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचं त्याची प्रमुख कारणं ई केवायसी, जमीन पडताळणी पूर्ण नसणं किंवा डीबीटी सक्रीय बँक खात्याची माहिती अपडेट नसणं ही आहेत.

ई केवायसी कशी पूर्ण करायची?

-पीएम किसान सन्मान निधीचं अधिकृत अ‍ॅप प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करा.

-पीएम किसान सन्मान निधीचं अधिकृत अ‍ॅप इन्स्टॉल करा.

-त्यानंतर लॉगीन पर्यायासमोर लाभार्थी हा पर्याय निवडा.

-नोन्डानी कर्म किंवा समर्थन क्रमांक.

-आधार क्रमांक टाकल्यानंतर स्कॅन फेसिंगचा पर्याय स्वीकारा, त्यानंतर ई केवायसी 24 तासात पूर्ण होईल.

-ई केवायसी तुम्ही सीएससी केंद्रांवर देखील करु शकता.

-याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातील डीबीटी इनेबल हा पर्याय सुरु करुन ठेवणं देखील आवश्यक आहे.

इतर बातम्या :

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण…

अधिक पाहा..

Comments are closed.