पीएम किसान योजना: पीएम किसानचा 23 वा हप्ता 18 जून रोजी उपलब्ध होईल? शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

पीएम किसान योजना: पीएम किसानचा 23 वा हप्ता 18 जून रोजी उपलब्ध होईल? शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

पीएम किसान योजना | देशातील करोडो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून या योजनेंतर्गत पात्र अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये जमा केले जातात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता 23व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. हा हप्ता कधी मिळेल, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. आता या 23 व्या हप्त्याबद्दल एक मोठे अपडेट आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधून PM किसान योजनेचा 22 वा हप्ता वितरित केला. आसाममधील गुवाहाटी येथून 22 व्या हप्त्याद्वारे 9.32 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रु. 18,640 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. आता 23 वा हप्ता 18 जून 2026 रोजी जमा केला जाईल अशी चर्चा आहे. कारण याआधी 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षीही त्याच तारखेला हप्ता मिळू शकेल असा अंदाज आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PM किसान योजनेचे हप्ते साधारणत: चार महिन्यांच्या अंतराने भरले जात असल्याने, 23वा हप्ता जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला जमा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पहावी. पीएम किसान योजना

दरम्यान, पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास हप्ता अडकू शकतो.

शेतकरी त्यांची लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 'फार्मर्स कॉर्नर' मधील 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करून, नोंदणी क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने पूर्ण हप्त्याचे तपशील पाहता येतील.

केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच 23 व्या हप्त्याची नेमकी तारीख स्पष्ट होणार असली, तरी जून-जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपयांचा पुढील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. पीएम किसान योजना

दरम्यान, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेसाठी तब्बल 63,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मागील अर्थसंकल्पातही पीएम किसानसाठी हीच रक्कम मंजूर करण्यात आली होती. पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. दर 4 महिन्यांनी बँकेत 2000 रुपये जमा होत असल्याने शेतकरीही आनंदी आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असून ही रक्कम बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी उपयुक्त आहे. लहान शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Comments are closed.