पोलिसांची बाथरूममधून एंन्ट्री, काही मिनिटांचा थरार अन्…; 17 मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोर


ब्रेकिंग: मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये काल घडलेल्या ओलिस (Rohit Arya) नाट्यप्रकरणाची आता सर्व माहिती समोर येताना दिसत आहे. एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून मुलांना ओलिस ठेवल्याची धक्कादायक घटना काल (गुरूवारी, ता ३०) घडली. एका साध्या कास्टिंग कॉलपासून सुरू झालेल्या घटनेने पुढे काही मिनिटांत धक्कादायक वळण घेतलं. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) क्विक रिअ‍ॅक्शन टीमने १७ लहान मुलांसह, एका वृद्धाला आणि एका महिलेला वाचवलं. ३८ वर्षीय रोहित आर्य (Rohit Arya) पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

Rohit Arya : पोलिसांची टीम बाथरूममधून आतमध्ये घुसली अन्…

रोहित आर्यच्या तावडीतून १७ मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवलं. मुलांना ओलीस ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीत प्रवेश केला होता. एका उंच शिडीचा वापर करून पोलिस या खिडकीतून आत घुसले होते. आतमध्ये गेल्यानंतर झटापटीदरम्यान एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळी  झाडली. ज्या खिडकीतून शिडीचा वापर करून पोलीस आत घुसले तो फोटो समोर आला आहे. पोलिसांची टीम बाथरूममधून आतमध्ये घुसली, पोलिसांनी सुरुवातीला रोहित आर्यशी बोलून परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने बंदूक आणि केमिकल्स दाखून जवळ आलात तर गोळीबार करण्याची आणि जाळून टाकण्याची धमकी दिली. जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात तो जखमी झाला.

Rohit Arya : प्रकरणाचा पुढील तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग

रोहित आर्यने मुलांना ओलिस ठेवले असताना पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आर्यने आधी तात्काळ माजी मंत्री दिपक केसरकर यांच्याशी संवाद घडवण्याची मागणी केली. त्यानंतर मला तुमच्या कोणावरही विश्वास नसून यापुढे संवाद साधू नका ही भूमिका त्याने पोलिसांकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पवईत रोहित आर्यने मुलांना बंदी बनवून ठेवलेल्या स्टुडिओतून पोलिसांना पिस्टल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्यूशन आणि लायटर हे जप्त केलेले आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्यावर कलम कलम १०९(१), १४०, २८७ बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून घटनास्थळाहून जप्त करण्यात आलेल्या वस्तू पोलिसानी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Who is rohit arya: कोण आहे रोहित आर्य

रोहित आर्य हा मुंबई पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करतो. सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी सांगतो. ‘अप्सरा’ नावाने त्याचे युट्यूब चॅनेल आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

Rohit arya project investent: रोहितचे एका प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे

रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Rohit arya: नेमका प्रकार काय?

पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केले जात होते. त्यासाठी, 17 जणांचे फाइनल कास्टिंग झाले. त्यामुळेच, येथील स्टुडिओत आज 17 मुले आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुले स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुले काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

आणखी वाचा

Comments are closed.