पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाक
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर व पुतण्या शिवम आंदेकर यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल २१ कोटी ६० लाख रुपये जमा असल्याची माहिती समोर आली आहे, मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या खंडणीतून (Pune Crime News) ही रक्कम जमा झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांच्यासह अकरा जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिली आहे. (Pune Crime News)
आंदेकर टोळीने संघटितरीत्या व्यापाऱ्यांकडून २० कोटी रुपयांहून अधिक खंडणी घेतलेली आहे. जागा उपलब्ध करून देणे किंवा व्यवसायात सहकार्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना धमकातून ही खंडणी वसूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात आरोपी बंडू आंदेकर व शिवम आंदेकरला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी केली. आरोपींच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण आणि अॅड. ए. एस. धीवार यांनी बाजू मांडली. पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणताही आधार नसल्याचा युक्तिवाद अॅड. चव्हाण यांनी केला.
Pune Crime News: पोलिस आरोपींना सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी
दोन्ही बाजू ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी कृष्णा आंदेकर पोलिस कोठडीत असताना त्याची परेड काढल्याबाबत बचाव पक्षाचे वकील अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयाकडे तक्रार केली. न्यायालयाने बचाव पक्षाच्या तक्रारींची दखल घेत पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले. कोठडीतील आरोपींची सार्वजनिक ठिकाणी परेड काढणे कायद्याला अपेक्षित नाही आणि योग्यही नाही, असेही यावेळी कोर्टाने सुनावले.
आणखी वाचा
Comments are closed.