बुलढाण्यात वाळू माफियांवर पोलिसांची धडक कारवाई, सात बोटींसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा क्राईम न्यूज : महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन पोलिसांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील वाळू माफियांवर धडक कारवाई केली. खडकपूर्णा धरण क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. वाळू उपसा करणाऱ्या सात बोटींसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमामात अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आज कारवाई केली आहे.

खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा

खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. परिसरातील नागरिकांनी अवैध रेती उपसा संदर्भात 300 च्या वर तक्रारी करूनही महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मात्र पोलीस अधीक्षकांना तक्रार प्राप्त होताच याची दखल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेत कालपासून खडकपूर्णा धरण क्षेत्रातील अवैध वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असून जवळपास सात वाळू उपसा करणाऱ्या बोटीनसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खरं तर ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे अपेक्षित असताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दिवस-रात्र रेती वाहतूक सुरु असल्याने रेती माफियांचे बळकट

अनेक ठिकाणी अवैध रेती वाहतूक सुरु आहे. दिवस-रात्र रेती वाहतूक सुरु असल्याने रेती माफियांचे बळकट जाळे तयार झाले आहे.याविरोधात महसूल विभाग कारवाई करत आहे. मात्र, कारवाई केल्यानंतरही अवैध वाहतूक सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध रेती वाहतूक करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी आणि निवासी जिल्हाधिकाऱ्यांवरही प्राणघातक हल्ले झाल्याचे समोर आले आहे.

मोफत रेती योजनेचाही फज्जा

शासनाने जाहीर केलेल्या मोफत रेती योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांना घरबांधणीसाठी मदत मिळावी. पण इथे ही योजना दलाल आणि माफियांकडून हडप केली जात असल्याचा आरोप होत आहे. मोफत रेतीचे नियमानुसार वितरण न होता तीच रेती नागरिकांना पैसे मोजून खरेदी करावी लागत आहे. काही ठिकाणी तर यासाठी हप्ते पद्धतीनेही पैसे घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon News: जळगावात अवैध रेती वाहतूक उघडपणे सुरू; रेती माफियांची मुजोरी, महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या 7 घटना

आणखी वाचा

Comments are closed.