निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदव


पुणे: राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच (Political News) पुण्यातील मावळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडेंमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. भेगडेंनी (Political News)लोणावळ्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश करुन घेतले तर शेळकेंनी ओव्हळे गावच्या सरपंचांसह समर्थकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. यानिमित्ताने महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभी ठाकली आहे.(Political News)

तर दुसरीकडे चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडीवरून चिपळूणमध्ये युती आणि आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीचे घोडे अडले आहे. प्रत्येक पक्षातून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडली असल्याचं चित्र दिसून येत आहे. महायुतीकडून भाजपा नगराध्यकपदासाठी आग्रही  असल्याचं दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीमध्येही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. नगराध्यक्षपदाचा तिढा सुटता सुटत नसल्याने चिपळूणमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. तिढा सोडवताना वरिष्ठ नेत्यांचा लागणार कस लागणार आहे. लोणावळ्यात भाजपकडून पहिल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपने लोणावळा नगरपरिषदेसाठी पहिल्या यादीत अकरा उमेदवार केले जाहीर

अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी भिडण्यास सज्ज झालेल्या भाजपने लोणावळा नगरपरिषदेसाठी पहिल्या अकरा उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीये. तेरा प्रभागांतील 27 जागांसाठी ही निवडणूक होतेय. उद्यापासून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरले जाणारेत. त्यासाठीची पहिल्या यादीत अकरा उमेदवार जाहीर करत भाजपच्या बाळा भेगडेंनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे कोणते शिलेदार रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

आणखी वाचा

Comments are closed.