Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले

अजित पवार : महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी झाली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळं संताप व्यक्त केला. स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करुन घेतले. स्वतःच काम झालं की झालं का? उद्या येऊन दोघांना भेटायला सांगा. हे असलं चालणार नाही असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

मला साहेबांमुळे, राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली

आपल्याकडे राज्यपाल प्रजासत्ताक दिन साजरा करतात पण आपले राज्यपाल गुजरात आणि महाराष्ट्रासाठी एकच आहेत त्यामुळे ते गुजरात ला प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. मला साहेबांमुळे, राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली त्यामुळे मी कधी जातीचा पातीचा विचार केला नाही. यावेली कृषी प्रदर्शन 8 दिवस आम्ही ठेवलं होतं. माळेगावच्या शिक्षण संस्थेसाठी 5 कोटी सीएसआरमधून मंजूर केला आहे. 24 ते 55 पर्यतचे उमेदवार आम्ही दिले आहेत. त्यामुळे काही जण नाराज झाल्याचे अजित पवार म्हणाले.

आगामी काळात वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊ. माझा व्याप जरी वाढला असला तरी माझं लक्ष इथे आहे. मी हलक्या कानाचा नाही. माझं सगळीकडे लक्ष असते असे अजित पवार म्हणाले. आम्ही हर्षवर्धन पाटील एक झालं तर बिघडलं कुठं. आम्ही काय भांडत बसायचं का? असा सवाल देखील अजित पवार यांनी केला.

Comments are closed.