Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेत नेमक दोषी कोण? कुणाचा हलगर्जीपणा हे अजूनही स्पष्ट झालेलं नसताना मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी पहिल्या काही तासात थेट महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंचा राजीनामा मागितला.शिवसेनेच्या संजय घाडेंनी आपली मागणी लावून धरलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने आणि भाजपा नेते आयुक्तांच जाहीर समर्थन करतात आणि त्यामुळे राज्यामध्ये सध्या एक नवीनच राजकारण रंगलेल बघायला मिळतंय.उद्धव ठाकरेंपासून सगळे नेते सहा खासदार फुटल्यानंतर हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस असल्याच विधान करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासातल्या अधिकाराचा राजीनामा शिवसेनेने मागणं आणि त्याच वेळी ठाकरेंनी मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सहज घडलेलं नाहीये राज्याच्या राजकारणाचा प्रतिबिंब म्हणून या घटनेकडे बघाव लागेल.
Comments are closed.