Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले…
मराठी PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले…
मी आताच राहुल शेवाळे आणि काते यांच्याशी बोललो, ते घटनास्थळी आहेत
एका स्कूल बसवर झाड कोसळलं आहे, त्यामध्ये काही मुलं जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे
राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितलं आहे संबंधित डॉक्टरांशी बोलुन त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या मी सुचना दिल्या आहे
झाडांच्या फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी केली जाते, दुर्दैवाने हे झाडं कोसळलं, त्याबाबतीत माहिती घेतली जाईल,
भविष्यात अशा दुर्दैवी घटना होऊ नये, यासंदर्भातील सूचना दिल्या जातील
—————————————-
आरक्षण उपवर्गीकरणाच्या आंदोलनावर
आताच माझ्याकडे आरक्षण उपवर्गिकरण समितीचे आनंदराज आंबेडकरजी होते, नाना घोलप होते, त्याचबरोबर इतरही त्यांचे सहकारी उपस्थित होते,
त्यांचा आज मोर्चा होता, त्यांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं
त्यांच्या सोबत बोलुन चर्चा आणि सूचना करून काही मुद्दे समोर आले
आम्ही त्यांना सांगितलं महायुतीचं सरकार कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही, सर्व समाजाला न्याय देणारं सरकार आहे
आज देखील काही २५ आमदार मला भेटले होते
Comments are closed.