Karuna Sharma On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली, करुणा शर्मांचा गंभीर आरोप
Karuna Sharma On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली, करुणा शर्मांचा गंभीर आरोप
करुणा शर्मा: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते असा निकाल मुंबईतील माझगाव न्यायालयाने दिल्यानंतर आता करुणा शर्मा (Karuna Munde Dhananjay Munde)यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे. धनंजय मुंडे आणि विरोधात दाखल झालेल्या याचिकेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत प्रॉपर्टीची विक्री करण्यात येऊ नये हा अर्जही करुणा शर्मा यांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटलं की, स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे.
स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली
पुढे बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या, मला 2 लाख पोटगी मिळाली, तेव्हापासून आणि आमदारकी रद्द होणार असं कोर्टाकडून नोटीस देण्यात आली, तेव्हापासून मला धमक्या येत आहेत. स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरुच आहे, यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाॅट्सॲप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत, पोलिस तक्रार दाखल करतात. मात्र काही करत नाही. दबावतंत्र धमकी देण्याचे काम करत आहे, बहिणीवर बोलत आहे, म्हणून मला धनंजयने धमकी दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Comments are closed.