Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत कुठला पक्ष किती जागा लढवणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपनं आपल्या मित्रपक्षांसाठी औदार्य दाखवल्याचं या जागावाटपातून दिसून आलंय. १७ पैकी १४ ठिकाणी स्पष्ट बहुमत असतानाही भाजपनं ११ जागा लढवत सहा जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला ४ तर राष्ट्रवादीच्या वाट्याला २ जागा आल्यात. अर्थात, जागावाटप ठरलं असलं तरी महायुतीसमोरची आव्हानं त्यापुढेही कायम असणार आहेत.रायगडच्या जागेसाठी भरत गोगावलेंंनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावली होती. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संख्याबळाचा दाखला दिलाय. अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची जागा आणि त्याबदल्यात शिवसेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद असं राजकीय साटंलोटं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सध्या तरी याविषयी मौन बाळगणंच तटकरेंनी पसंत केलंय. एकीकडं गोगावलेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असताना दुसरीकडं तटकरेंनीही शिंदेंच्या नेतृत्वाचं तोंडभरून कौतुक केलंय. तटकरेंची बॉडी लँग्वेज पाहता त्यांनी तहात बरंच काही जिंकून घेतल्याची चर्चा रंगलीय. आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून…

Comments are closed.