Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप

Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप

एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर संपवल्यानंतर आमदारांचं ऑपरेशन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑपरेशन टायगर 3.0 सक्रिय झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चार आमदार दोन तीन दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. त्या आमदारांनी 12 आमदार सोबत असल्याचं सांगितल्याचं माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 असून त्यापैकी दोन तृतियांश आमदारांची संख्या 14-15 इतकी होते. त्यामुळं आगामी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आमदारांनी शिंदेंकडून मागून घेतल्याची माहिती आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यात चौदा ते पंधरा आमदारांचा एक गट स्थापन करुन मग हे सगळे जण ठाकरेंपासून वेगळे होतील. त्यानंतर ऑपरेशन टायगर 3.0 पूर्ण होईल, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदेंना ठाकरेंचे चार आमदार भेटले होते, त्यांनी 12 आमदार सोबत असल्याची माहिती दिली आहे.  खासदारांच्या पक्षांतरामुळं निर्माण झालेला रोष वाढू नये यामुळं आमदारांचं ऑपरेशन येत्या दोन ते तीन महिन्यात राबवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेना कोणते आमदार भेटले याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. सहा खासदार कोण फुटतील हे सांगितलं जात होतं, त्याप्रमाणं कोणते आमदार फुटणार याबाबतची माहिती जशी समोर येईल तशी सांगितली जात आहे. खासदार फुटल्यानंतर आमदार फुटल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसू शकतो.

खासदार नरेश मस्के काय म्हणाले?

जे काय घडणार आहे, ते तुमच्या समोर येईल, असं नरेश मस्के म्हणाले. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भूमिकांना कंटाळून बाहेर पडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी कार्यकर्ते जोडले जात आहेत. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काम होत आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख वाटत नाहीत, इतर माणसं तेच पक्षप्रमुख आहेत, अशा आवेगात आहेत. या गोष्टींना आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वैतागले आहेत आणि त्यामुळं ते साथ सोडत आहेत, असं नरेश मस्के म्हणाले.

Comments are closed.