रेवती सुळेंच्या लग्नात सुनेत्रा पवारांसोबत एन्ट्री; आता पार्थ पवारांची पत्नी होणार, कोण आहेत कायनात धार?
येथे प्रकाशित : 11 जुलै 2026 12:36 PM (IST)
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement Marathi News: पवार कुटुंबात (Pawar Family) लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेंचा विवाह सोहळा पार पडला.
आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार, दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar ) आणि कायनात धार (Kaynaat Dhar) यांचा पुण्यात साखरपुडा होणार आहे. 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्नसोहळा आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांच्या एन्ट्रीने सगळ्याचं लक्ष वेधलं होतं.
पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार देखील उपस्थित होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि कायनात धार देखील रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिली. यानंतर पार्थ पवार आणि कायनात धारची चर्चा रंगली होती. (Parth Pawar And Kaynaat Dhar)

कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. यापूर्वीही ती पार्थ पवार यांच्यासोबत काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.
काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

पवार कुटुंबातील रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांचा विवाह मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रवेश केला. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
कायनात केवळ आनंदाच्या प्रसंगातच नाही, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत उभी राहिलेली दिसली. अजित पवार यांच्या निधनानंतर कायनात धार बारामतीत पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती. इतकेच नव्हे तर, मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही तिने हजेरी लावली होती.

पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसणे, पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे, तसेच रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यातील उपस्थितीमुळे कायनात धार सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती.
कोण आहेत कायनात धार? (Who is kaynaat Dhar)- कायनात धार ही मूळची हरियाणाची असून, सध्या ती दिल्लीत वास्तव्यास आहे. पवार कुटुंबाशी तिचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. कायनात धार ही गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे.
येथे प्रकाशित : 11 जुलै 2026 12:36 PM (IST)
Comments are closed.