Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: अभिनेता जोसेफ विजय (Vijay Thalapathy) यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर (Tamil Nadu Politics) आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींची उपस्थिती होती.
चेन्नई येथील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच, विजय यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली. या स्वाक्षऱ्यांद्वारे, घरगुती ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित एका विशेष दलाची स्थापना करण्यास विजय यांनी मंजुरी दिली. (Vijay Thalapathy Tamil Nadu Politics)
Comments are closed.