रोनाल्डोला मनमानीपणा पडला महागात! पोर्तुगलने 30 दिवसांची घातली बंदी, भलामोठा दंडही ठोठावला
फुटबॉल दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सोमवारी (१९ ऑक्टोबर) एक धक्का बसला. राष्ट्रीय संघाचे शिबिर न सांगताच सोडल्याने पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने (FPF) त्याच्यावर ३० दिवसांची बंदी घातली आहे.
रोनाल्डोला ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून, त्याला २५५ युरोचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ख्रिस्तियानोने सोशल मीडियामार्फत स्वतः माफी मागून, आपल्याला शिक्षा दिली जावी, अशी विनंती केली होती.
डेन्मार्कमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरातून निघून गेल्याप्रकरणी पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने हा निर्णय घेतला आहे.
संघातील रोनाल्डो आणि प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. यानंतर तो डेन्मार्कविरुद्धच्या सामन्याआधी कोपनहेगनमधील संघाचा कॅम्प सोडून निघून गेला. यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संघातील रोनाल्डोच्या भूमिकेवरून झालेल्या मतभेदांमुळे तो नाराज असल्याचे समोर आले होते. जीझस यांनी दोनदा दिलेली आश्वासने मोडल्याचा आरोप रोनाल्डोने केला होता. त्याला नॉर्वेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. तो त्या संपूर्ण सामन्यात बेंचवरच बसून होता. त्यानंतर सामना संपताच रोनाल्डो सहकाऱ्यांना न भेटताच निघून गेला. त्याच्या या रिऍक्शनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
या घटनेनंतर पोर्तुगीज फेडरेशनने त्याच्यावर कारवाई केली आणि त्यांच्या नियमावलीतील कलम १६०(१) अंतर्गत त्याला दोषी ठरवले. त्यानंतर त्याच्यावर निलंबन आणि दंडाची कारवाई करण्यात आली.
झालेल्या घटनेनंतर रोनाल्डोने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरून एक भली मोठी पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने संघसहकाऱ्यांची आणि चाहत्यांची माफी मागितली. तसेच त्याला योग्य ती शिक्षा देण्याची विनंती केली होती. (Portugal Federation suspends Cristiano Ronaldo for 30 day)
Comments are closed.