आठ महिन्यांनंतर प्रबोधनकार ठाकरे जलतरण तलाव पुन्हा सज्ज; १ ऑक्टोबरपासून जलतरणपटूंना सरावासाठी खुला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या आठ महिन्यांपासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील ऑलिम्पिक धर्तीचा जलतरण तलाव आता पुन्हा जलतरणपटूंच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. तलाव सुरू होण्यापूर्वीच प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १ ऑक्टोबरपासून जलतरणासाठी तलाव नियमितपणे खुला होणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाण्यापासून दूर असलेल्या जलतरणपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नूतनीकरणामुळे बंद असलेल्या या तलावाला आता नव्या दमाने नवा साज चढला आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज झालेला आणि ऑलिम्पिक धर्तीवरचा हा प्रशस्त तरण तलाव विलेपार्लेकरांसह परिसरातील जलतरणप्रेमींसाठी पुन्हा एकदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे केवळ हौशी जलतरणपटूच नव्हे, तर नियमित सराव करणाऱ्या जलतरणपटूंनाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.

१७ ऑगस्टपासून प्रवेश नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे धोरण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जलतरणाची आवड असणाऱ्या नागरिकांनी आणि नियमित सराव करणाऱ्या जलतरणपटूंनी प्रवेशासाठी आताच नोंदणी करून आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ पासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रवेश घेणाऱ्या नागरिकांसाठी जलतरण तलाव नियमितपणे सुरू होणार आहे.

‘स्टेटस क्वो’ असताना घटनादुरुस्तीचा ‘डाव’ का?

२०२३ मध्ये कार्यकाळ संपलेल्या राज्य संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेवर न्यायालयीन वाद सुरू असताना आणि सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेटस क्वो’चा (स्थिती ‘जैसे थे’) आदेश दिलेला असताना घटनादुरुस्ती आणि एजीएम घेण्याचा अधिकार संघटनेला होता का, हा थेट सवाल उपस्थित झाला आहे. स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश असताना घटनाच बदलता येते का, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता; अनेक जण खासगीत बोललेसुद्धा, पण एजीएममध्ये कुणी प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस दाखवले नाही. मात्र न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने केलेली घटनादुरुस्ती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

Comments are closed.