एकतर गोळी खा नाही तर गोळी द्या! रोहित आर्य प्रकरणावर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच मत
रोहित आर्य चकमकीत प्रदीप शर्मा: मुंबईतील पवई परिसरातील आर. ए. स्टुडिओमध्ये 17 मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य (Rohit Arya) नावाचा 50 वर्षीय युट्यूबर चकमकीत ठार (रोहित आर्य एन्काउंटर) झाला. दरम्यान या प्रकरणात्यामुळे आता धक्कादेणारा खुलासे होत असून राज्याचे राजकारण देखील तापू लागले आहे. दरम्यान याच बिंदूवरून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांni(प्रदीप शर्मा) रोखठोक प्रतिक्रिया देत भाष्य केलंय.
Pradeep Sharma on Rohit Arya Encounter : एनकाउंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो
मुंबई पोलिसांनी केलेल्या रोहित आर्यच्या एनकाउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे, एनकाउंटर बनावट असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे, याप्रकरणी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले तेमाझ मत आहे जे काही झाले ते योग्य आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून 17 मुलांना वाचवलं, त्याने केमिकल स्प्रे करून ठेवली होती. त्यामुळे आग लागण्याचा धोका होता. एनकाउंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो. एकतर गोळी खा, नाही तर गोळी द्या, मग पोलिस तर गोळी देणारच नाही, असे परखड करू नका त्यांनी व्यक्त केलंय.
Pradeep Sharma : पोलिसांनी घाबरायची गरज नाही, जनता त्याचा बरोबर आहे
100 आयपीसी प्रमाणे पोलिसांना पॉवर देण्यात आले आहेत. बलात्कार होत असताना बंदी बनवल असेल, जीवाला धोका असेल तर बळाचा वापर करण्याचा पॉवर कायद्याने पोलिसांना दिली आहे. तंतोतंत कायद्याच्या पालन झाल आहे, अस माझ मत आहे. हा फेक एनकाउंटर नाही. स्वतःचे पैसे वसूल करायला त्याने लहान मुलांचा वापर केला, हे कितपत योग्य आहे? अमोल वाघमारे याने सोसायटीसाठी हे केलय, 17 मुलांचा जीव वाचवला त्यांच कौतुक करायला हवं. अशाप्रकारे कोर्टात जाणे चुकीचे आहे. आरोपीने सगळी कबुली दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा एनकाउंटर जस्टीफ़ाइड आहे. पोलिसांनी घाबरायची गरज नाही. जनता पोलिसांच्या बरोबर आहे. असेही प्रदीप शर्मा म्हणाले.
Nitin Satpute on Rohit Arya Encounter : एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून छातीत गोळी झाडली
मुंबईच्या पवई परिसरात 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काऊंटर (Mumbai Police encounter) बनावट होता. पोलिसांना रोहित आर्य याच्या हात किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. मात्र, डीसीपी अमोल वाघमारे (Amol Waghmare) यांना हिरो व्हायचे असल्याने त्यांनी रोहित आर्य (Rohit Arya) याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले, असा खळबळजनक आरोप अॅडव्होकेट नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी केला. रोहित आर्य याला गोळी मारुन ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का, असा सवाल अॅडव्होकेट नितीन सातपुते विचारला.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.