पीएम किसानच्या 20 हप्त्याचे पैसे जमा, शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा, 2000 कधी येणार?
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून चालवली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात तीन समान हप्त्यात प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं 6000 दिले जातात. ही योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून तेव्हापासून शेतकऱ्यांना 20 हप्त्यांची रक्कम अदा करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पूरग्रस्त राज्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे.
PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 व्या हप्त्याचं वितरण 2 ऑगस्टला वाराणसी येथून करण्यात आलं होतं. पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 रुपये चार महिन्यांच्या कालावधीनंतर दिले जातात. मात्र, देशातील काही राज्यातील पूरस्थितीतून सावरण्यासाठी मदत म्हणून 21 व्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2 ऑगस्टपासून चार महिन्यांचा कालावधी पकडल्यास नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानचे 2000 रुपये मिळणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्यावतीनं पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर राज्यातील शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम दिलेली आहे.
पीएम किसान लाभ सुरु ठेवण्यासाठी काय करावं?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरु राहावं यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. बँक खातं आधार क्रमांकासोबत लिंक करणं, बँक खात्याच्या डिटेल्सची पडताळणी करणे. जमीन नावावर असल्यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करणे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर लाभार्थी स्टेटस तपासणे. मोबाईल क्रमांक ओटीपी आणि नोटिफिकेशनसाठी अपडेट असावा.
पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला?
एप्रिल ते जुलै या कालावधीतील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9 कोटी 71 लाख 41 हजार 402 शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम देण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील 92 लाख 84 हजार 720 शेतकऱ्यांना पीएम किसानची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेप्रमाणं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.
आणखी वाचा
Comments are closed.