काल देवाभाऊंचं कौतुक अन् आज प्रज्ञा सातव म्हणाल्या, ‘राहुल गांधी-सोनिया गांधी आजही माझ्यासाठी द
प्रज्ञा सातव बातम्या: मी फक्त विकासाच्या ध्यासापोटी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाने मला दोनवेळा विधानपरिषदेवर जाण्याची संधी दिली यासाठी मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ऋणी आहे. हे दोघेही माझ्यासाठी आजही दैवत आहेत, असे वक्तव्य नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी केले. प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. यानंतर आज त्यांनी हिंगोलीत भाजप नेते मुटकुळे यांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा प्रज्ञा सातव यांनी पुन्हा एकदा विकासाच्या मुद्दा अधोरेखित केला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आमचं आनंदाने स्वागत केलं. त्यांचं आमच्या परिवाराबद्दल असलेलं प्रेम पाहून मी आनंदाने भारावून गेले. इथून पुढे आम्ही राजूभाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात हात घालून काम करणार आहोत. विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले. यावेळी त्यांना तुमची आमदारकीची पाच वर्षांची टर्म बाकी असताना तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेलात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा सातव यांनी म्हटले की, तुम्ही जिल्ह्यातील परिस्थिती बघत असाल. आमच्या कळंबोलीत विकासाचा जो अनुशेष राहिला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत, सिंचनाच्याबाबत तो भरुन काढायचा आहे. आमचे बरेच कार्यकर्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. देवाभाऊ राज्यभरात चौफेर विकास करत आहेत. त्यांनी उभारलेल्या समृद्धी महामार्गामुळे आमचे सगळे कार्यकर्ते एका रात्रीत मुंबईला पक्षप्रवेशासाठी पोहोचले. याच विकासाच्या कामात आम्हाला हातभार लावायचा आहे, असे प्रज्ञा सातव यांनी सांगितले.
Rahul Gandhi & Sonia Gandhi: राहुल गांधी आणि सोनिया गांधी आजही माझ्यासाठी दैवत: प्रज्ञा सातव
काँग्रेस पक्षाने मला दोनवेळा विधानपरिषदेवर पाठवून आमदारकी दिली, हे मी नाकारत नाही. मला मॅडम सोनिया गांधी आणि राहुल गांधीजी यांच्यामुळे आमदारकी मिळाली. ते दोघेही माझ्यासाठी दैवत आहेत. राजीव सातव आणि रजनी सातव यांच्याप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही माझ्या मनात राहतील. मॅडम आणि बॉस माझे देव आहेत, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले.
मी भाजपमध्ये येताना देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. मी स्वखुशीने या पक्षात आले आहे. मी आता भाजप कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. सतेज पाटलांना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपने मला गळाला लावले, या चर्चांबाबत मला माहिती नाही. आताच विधानपरिषदेचे अधिवेशन झाले. आमच्याकडे संख्याबळ असते तर याच अधिवेशनात विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता दिसला असता, असेही प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.