…सिरीयस घेण्याची गरज नाही; उदय सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
धूळ पटेल: शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मित्रपक्षांना धमकी वजा इशाराच दिलाय. आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवू.असा इशारा सामंत यांनी मित्र पक्षांना दिला होता. दरम्यान उदय सामंतांच्या या वक्त्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी “असे स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्यायचे नसते. स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखविण्याकरिता असे वक्तव्य करावे लागतात, त्याच्यामुळे त्याला इतका सिरीयस घ्यायचं नसतं, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिलीय.
Praful Patel : कितीही एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही
महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या एंट्री संदर्भात संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपूर्तीच आहे. ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ज्यांना सोबत यायचं त्यांचे स्वागत आहे. असं वक्तव्य केलं होतं, यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ठाकरे बंधू एकत्र येतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी परत महाविकास आघाडी तयार करावी, पण ते कितीही एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला आहे. त्याच्यामुळे राज्यातील जनता ही समजदार असून कोणाची युती झाली तरी काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
Nana Patole : निर्णय दिल्लीतील हायकमांडचा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडीमध्ये (MVA) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य प्रवेशावरून मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमध्ये (Congress) मतभेद असल्याचे दिसून येत आहे. ‘दिल्लीमध्ये महाविकास आघाडी जेव्हा आली, तेव्हा सर्व पक्ष नेत्यांचा समावेश व्हावा याचा निर्णय त्यांच्या हायकमांडने घेतलेला होता’, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
एकीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘नवा भिडू नको’ म्हणत मनसेच्या (MNS) समावेशाला विरोध दर्शवला होता, तर दुसरीकडे नाना पटोले यांनी हा निर्णय दिल्लीतील हायकमांडचा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात हजेरी लावल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.