हा तिरस्कार मी डिझर्व्ह करतो'; प्रणित मोरेची भावनिक प्रतिक्रिया व्हायरल

मुंबई – स्टँड – अप कॉमेडियन प्रणित मोरे आपल्या ऑडियन्समुळे चांगला संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे… नुकताच त्यांच्या शोचे क्लीपस् सोशल मिडीयावर व्हायरल झालेत ज्यामध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपहार्य वक्तव्य केलंय, ज्यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त होत आहे… ज्यामुळे प्रणित मोरे याला सोशल मिडीयावर येऊन माफी मागावी लागली आहे…

काय आहे प्रकरण

कॉमेडियन प्रणित मोरे शोमध्ये हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार या दोघांनीही अश्लील टिपण्णी केली होती.एकीकडे ज्यामध्ये तर हिमांशू जांगडा हा त्यांच्या डेटचा किस्सा सांगतो ज्यात तो म्हणतो की तो एकदा एका मुलीसोबत डेटवर गेला होता तेव्हा त्याने बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले, आता वसूल तर करावे लागतील ना…’ असं म्हणत त्या तरुणानं तरुणीकडून बिर्याणीच्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सुचित केले.तर दुसरीकडे डॉ. सेजल पवार या तरुणीने देखील मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील टिपण्णी केली.त्याच्या या विधानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे…

त्यांनतर हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्यावर लोकांचा संताप उसळला आहे.. या दोघांसोबत प्रणित मोरे याला ही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे… लोक प्रणितचा शो बंद करण्याची मागणी करत आहेत. कॉमेडिच्या नावाला या शोमध्ये अश्लीलता चालु असल्याचे नेटकऱ्यांकडुन बोललं जात आहे… यावर आता प्रणित मोरे यांने सोशल मिडीयावर व्हीडीओ शेअर करत माफी मागितली आहे…

त्याने व्हीडीओत म्हणलंय की, हॅलो, खरंतर मला ही गोष्ट काही दिवसांपूर्वीच बोलायची होती. पण माझं इन्स्टाग्राम सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा क्राऊड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल. या व्हिडीओमुळे माझा लोकांकडून तिरस्कार केला जात आहे. मला असं वाटतं की, हा तिरस्कार मी डिझर्व्ह करतोय. कारण त्या तरुणासोबत जेव्हा मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं बऱ्याच अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण त्यावर हसत होते’.’मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो होते. तेव्हा माझ्याकडून चूक झाली. मी त्याला थांबवू शकलो असतो, एक बाजू घेऊ शकलो असतो, पण मी ही गोष्ट करु शकलो नाही. मी त्याला प्लॅटफॉर्म दिला आणि हे सगळं एवढं वाढत गेलं. जे कुणी यामुळे दुखावले गेले असतील, त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो’

‘कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मला एक संधी द्यावी, मी एक चांगला माणूस बनून दाखवेन. मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या कॉन्टेंटवर काम करेन’, असं म्हणत प्रणित मोरेनं माफी मागितली. दरम्यान, प्रणित मोरेच्या माफिनाम्यानंतर त्यावर कोणती कारवाई केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments are closed.