धनंजय मुंडेंचा राजीनामा फडणवीसांच्या बंगल्यावर नेणारे प्रशांत भामरे पुन्हा सत्तेच्या केंद्रस्था

बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. नेत्यांवर आरोप प्रत्यारोप झाले, आंदोलने झाली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंडेंनी राजीमाना दिल्यानंतर त्यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंडेंचे सहाय्यक असलेले प्रशांत भामरे आता अजित पवारांचे खाजगी सचिव झाल्याची माहिती आरटीआय (RTI) अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट करून दिली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे नेऊन दिल्यानंतर  प्रशांत भामरे चर्चेत आले होते, त्यानंतर आता त्यांची नियुक्ती जित पवारांचे खाजगी सचिव झाल्याने पुन्हा एकदा त्यांची नावाची चर्चा होऊ लागली आहे.

आरटीआय (RTI) अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मिडियावरती पोस्ट करून ‘राजकारणात काहीच अंतिम नसतं, फक्त सोयीची समीकरणं असतात’, असं म्हणत प्रशांत भामरे यांच्या अजित पवारांच्या खाजगी सचिव पदी नियुक्ती झाल्याच्या कागदपत्राचा फोटो देखील शेअर केला आहे. ‘मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेलेले भामरे आता पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी. राजकारणात काहीच अंतिम नसतं, फक्त सोयीची समीकरणं असतात! उपमुख्यमंत्री/ मंत्री यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्यांच्या शिफारशीवरुन संबंधित मंत्री कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत’, असंही पुढे विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

विजय कुंभार यांची सोशल मिडिया पोस्ट काय?

“माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव! मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेलेले भामरे आता पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी. राजकारणात काहीच अंतिम नसतं, फक्त सोयीची समीकरणं असतात! उपमुख्यमंत्री/ मंत्री यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्यांच्या शिफारशीवरुन संबंधित मंत्री कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.” तर विजय कुंभार यांची ही सोशल मिडिया पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपल्या अकाऊंटवरून शेअर केली आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न-नागरी पुरवठा खातं दादांकडे

राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नैतिकता आणि आजारपणाच्या कारणामुळे मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंडेंचं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तुर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतला आहे. अजित दादांकडे मुंडेंचं खातं असल्यामुळे उपमुख्यमंत्री/ मंत्री यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्यांच्या शिफारशीवरुन संबंधित मंत्री कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे नेणारे प्रशांत भामरे

धनंजय मुंडे यांचा राजीनामा सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. या सर्व घडामोडी घडल्यानंतर सध्या धनंजय मुंडे राजकारणापासून दूर असल्याचं दिसून येत आहेत. आजारी असल्याने धनंजय मुंडे सध्या त्यांच्या गावातील घरी विश्रांती घेत असल्याचं त्यांच्या भावाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.