IPS अधिकारी आठ कोटींची फसवणूक प्रकरण; प्रताप सरनाईकांचा भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर आरोप

ठाणे : पंजाबमधील निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला आठ कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी मीरा भाईंदरमधील शेरा ठाकूर (Shera Thakur BJP) या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव समोर आलं. त्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर (Narendra Mehta) आरोप केले. शेरा ठाकूर हा नरेंद्र मेहतांचा जवळचा कार्यकर्ता असून मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाशिवाय असे कृत्य कुणी करत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पंजाबमधील निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांची आठ कोटींची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर अमर सिंह चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे धागेदोरे मीरा भाईंदर पर्यंत पोहोचले. भाजपचा पदाधिकारी शेरा ठाकूर याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Mira Bhayandar Cyber Fraud : भाजपच्या मोठ्या नेत्याचा सहभाग?

या प्रकरणावरुन प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर शरसंधान साधलं. ते म्हणाले की, “मीरा-भाईंदर शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा मंडळ अध्यक्ष आणि नरेंद्र मेहता यांचे बंधू विनोद मेहता यांचा अतिशय जवळचा सहकारी, नरेंद्र मेहता यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता असलेल्या शेरू ठाकूर याला पोलिसांनी पकडलं आहे. त्याने फार मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे. आठ कोटी रुपयांची अफरातफरी करून एका पोलीस अधिकाराच्या खात्यामधून ते स्वतःच्या खात्यात वळवले.”

आता मला फक्त हेच बघायचं आहे की यामध्ये आणखीन कोण नेते सहभागी आहेत का? अशा प्रकरणांमध्ये मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याशिवाय खालचे काही पदाधिकारी असं काही करणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली.

Pratap Sarnaik Vs Narendra Mehta : अनेक गुन्हेगार नरेंद्र मेहतांच्या सानिध्यात, सरनाईकांचा आरोप

भाजपचा पदाधिकारी आणि आमदार नरेंद्र मेहतांचा जवळचा कार्यकर्ता या प्रकरणामध्ये सापडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मेहतांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “नरेंद्र मेहता यांना या ठपक्याचा काही फरक पडत नाही. कारण त्यांच्यावर आधीच 25 ते 27 गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हेगार त्यांच्या सानिध्यात असतातच. लोकशाहीच्या माध्यमातून जामीन देऊन अनेक लोक बाहेर पडलेले आहेत, त्यातील तेही एक आहेत.”

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.