महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर; संजय जाधव, शिरिष जैन, सुभाष भुजंग, प्रवीण तेजाळे यांचा सन्मान

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात शौर्य गाजवणाऱ्या तसेच गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील 60 पोलिसांचा समावेश आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली. त्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक तसेच उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक

अपर पोलीस आयुक्त- शिरिष जैन, उप अधीक्षक- सुभाष भुजंग, सहाय्यक फौजदार- संजय वायचले.

शौर्य पदक जाहीर झालेले अधिकारी

आयपीएस- यतीश देशमुख, उपनिरीक्षक- राजू गवळी, वासुदेव मढवी, कॉन्स्टेबल- दिलीप आत्राम, अजय मडवी, दिनेश दुब्बूला, विजय मडवी, भूपेश जुमनाके, दलसू बोगामी, राजेश किरांगे, महा आत्राम, विजय कोडापे, दशरथ मडवी, राकेश बेडकी, सुधाकर पोर्तेत, श्रीनिवास निसतुरी, गणेश गांजीवर, नितेश टेम्बेकर, शिवाजी हिचामी, संजय कांकबंदवार.

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक

अपर पोलीस आयुक्त- संजय जाधव, विजयकुमार मगर, अधीक्षक- दिंगबर प्रधान, उप अधीक्षक- प्रशांत कुलकर्णी, भागीरथ देशमुख, प्रवीण तेजाळे, मनोजकुमार यादव, निरीक्षक- वैभवकुमार जाधव, संतोष बर्गे, विश्वजित कांईगडे, जितेंद्र कदम, विनोद पाटील, प्रदीप चौगांवकर, उपनिरीक्षक- जनार्दन देसाई, दिलीप धुमाणे, दीपक ठाकूर, प्रकाश कदम, चंद्रशेखर बाविस्कर, दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार- अंकुश न्यायनिर्गुणे, विलास इंगळे, मुज्जफर सय्यद, मोहन सौंदत्ती, संपत खैरे, गुलाब सोनार, शेअर फर्तले, शेरखान पठाण, सुनील कदम, शैलेश उपासनी, अरुण आत्राम, शिवानंद स्वामी, पांडुरंग पाटील, अन्वरली सय्यद, गणेश शिंदे, मनोज मांग्रुलकर, हवालदार- भारत गोहिल, राजकुमार जनबंधू.

राष्ट्रपतींचे सेवा सुधार पदकाने विकास रजनलवार यांचा गौरव

भायखळा महिला जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास रजनलवार यांना स्वांतत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आनंदाची बातमी मिळाली. रजनलवार यांची त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपतींचे उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे सेवा सुधार पदक जाहीर करण्यात आले.

Comments are closed.