तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ‘इफेक्ट’, दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीला लगाम; दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्या

>> गणेश हरमुलकर

अन्न आणि औषधी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमुळे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा बाजारच उठला आहे. रसायनयुक्त दूध बंद झाल्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. कारवाईच्या धसक्यापोटी दूध उत्पादकांनी थेट दुभती जनावरे खरेदी करण्यावर भर दिल्यामुळे या जनावरांच्या किमतीत तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बदल्यांसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न आणि औषधी प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि राज्याला या खात्याचे काम काय असते हे कळले. तुकाराम मुंढे यांनी पहिला प्रहार केला तो भेसळीवर. रसायनांपासून तयार होणारे दूध, तूप, पनीर, खवा, पेढा यात होणाऱ्या भेसळीला त्यांनी लगाम घातला. दुग्धजन्य पदार्थात भेसळीचे रॅकेट चालवणारांचे कंबरडेच मोडले. भेसळीचे हे विकृत रूप पाहून अनेकांनी दुग्धजन्य पदार्थ खाणेच सोडून दिले आहे. भेसळयुक्त दुधाचे प्रमाण राज्यात प्रचंड होते. मात्र तुकाराम मुंढे यांनी त्यालाही वेसण घातली. परिणामी दुधाचे उत्पादन घटले आहे. दुधाची वाढती मागणी पुरवण्यासाठी दूधउत्पादकांनी दुभती जनावरे खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.

दुभत्या जनावरांचा बाजार तेजीत

‘भेसळीपेक्षा दुभती जनावरे बरी’ या विचाराने दूध उत्पादक आता जनावरांचे बाजार धुंडाळू लागला आहे. गायींसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव, लोणी येथील बाजारात गीर, एचएफ हायब्रीड, साहीवाल, जर्सी, राठी तसेच थारपारकर या भरपूर दूध देणाऱ्या गायी मिळतात. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. तेथेही दुभत्या जनावरांची मागणी वाढली आहे.

दूध जास्त, किंमतही जास्त

जातीवंत दुभती गाय १० ते ४० लिटर दूध देते, तर म्हैस १० ते ३० लिटर दूध देते. जास्त दूध देणारे जनावर असेल तर त्याची किंमतही जास्तच असते. उन्हाळ्यात १० ते १५ लिटर दूध देणाऱ्या गायीची किंमत लाखापर्यंत होती. मात्र आता हीच गाय दीड लाखाला मिळत आहे. गायीचे वय कमी असेल तर किंमत अजून वाढते.

थेट हरियाणातून म्हशीची खरेदी

गायीपेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी आहे. हॉटेल व्यावसायिक बहुतांश म्हशीच्या दुधाचाच वापर करतात. स्थानिक बाजारात म्हशीची सध्याची किंमत १ ते ३ लाखांपर्यंत आहे. हरियाणात म्हशी स्वस्त मिळतात. धुळ्यातही म्हशी परवडणाऱ्या भावात मिळतात. मात्र दुधाची मागणी वाढल्याने या म्हशीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय

ग्रामीण भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. गावातच होणारे दूध संकलन, आठवड्याला मिळणारा पैसा यामुळे तरुण शेतकरी दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उतरला. दुग्ध व्यवसायात

Comments are closed.