प्रिशाची सुवर्णभरारी; काव्याला रौप्यपदक, किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियू असोसिएशनचे घवघवीत यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत असोसिएशनच्या दोन महिला खेळाडूंनी पदकांची कमाई केली. अंधेरी येथील गुंदवली बीएमसी स्कूल येथे या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, चुनाभट्टी येथील प्रिशा पिल्लईने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर कर्नाटक हायस्कूल, चेंबूर येथील काव्या शिंदेला रौप्यपदक मिळाले. या यशस्वी खेळाडूंना शिहान उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर आणि राहुल साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे. खेळाडूंच्या तांत्रिक काwशल्याबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर असोसिएशनकडून विशेष भर दिला जातो.

Comments are closed.