स्वतःच्या लग्नासाठी कैद्याला पॅरोल नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा निर्णय
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पैद्याला स्वतःच्या विवाहासाठी पॅरोल मिळू शकतो का? या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कारागृह नियमावलीत पैद्याच्या स्वतःच्या विवाहाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी केवळ या कारणावरून पॅरोल नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत एका कैद्याला विवाहासाठी सात दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
कुणाल ऊर्फ गोलू अनिल जयस्वाल हा पैदी अमरावती जिह्यातील मोर्शी खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचा विवाह 4 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथे नियोजित आहे. विवाहासाठी त्याने पॅरोलचा अर्ज केला होता. पोलिसांनी चौकशी करून माहिती खरी असल्याचा अहवालही दिला. मात्र, महाराष्ट्र कारागृह नियम, 2024 मध्ये स्वतःच्या विवाहासाठी पॅरोलची तरतूद नसल्याचे कारण देत कारागृह उपमहानिरीक्षकांनी 7 जुलै 2026 रोजी अर्ज फेटाळला. त्यानंतर पैद्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. 12 (3) या नियमानुसार पैद्याच्या मुलांच्या आणि भावंडांच्या विवाहासाठी पॅरोल देता येतो. मात्र स्वतःच्या विवाहासाठी स्वतंत्र तरतूद नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. याशिवाय, यापूर्वी पॅरोलचा लाभ घेतल्यामुळे एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा पॅरोल देता येणार नसल्याचेही सरकारने कोर्टात सांगितले.
Comments are closed.