VIDEO: शिवीगाळ, कॉलर पकडली, बॅटही उगारण्याचा प्रयत्न; पृथ्वी शॉ पुन्हा वादात सापडला, मैदानात ने
पृथ्वी शॉ: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सराव सामन्यादरम्यान पृथ्वी शॉची (Prithvi Shaw Video) मुंबईच्या मुशीर खानसोबत (Musheer Khan) बाचाबाची झाली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमका वाद काय? (prithvi shaw musheer khan)
रणजी चषक 2025-26 सुरू होण्याआधी मुंबई व महाराष्ट्राच्या संघात पुण्यात 7 ऑक्टोबरपासून सराव सामना खेळवला जात आहे. या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात मोठा राडा पाहायला मिळाला. महाराष्ट्राकडून खेळणारा पृथ्वी शॉ रागाच्या भरात त्याच्या जुन्या सहकारी मुशीर खानच्या अंगावर धावून गेला. यामध्ये शिवीगाळही झाली. पृथ्वी शॉने मुशीरची कॉलर पकडून बॅट उगारण्याचा प्रयत्न केला. क्रिकबजच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ इतका चिडला कारण मुशीर खानने स्लेजिंग केलं. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मुशीर थँक्यू म्हणाला. त्यामुळे पृथ्वी चिडला. अखेर पंचांनी व मुंबईच्या खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
पृथ्वीवरील शॉ आणि मुशिर खान या मैदानावर संघर्ष करीत राहिल्या आणि थेट सामन्यादरम्यान गोंधळ उडाला; व्हिडिओ पहा.#प्रिथविशॉpic.twitter.com/1vwf55rbme
– आदिवासींचा आवाज 🏹 (@voiceoftribals_) 7 ऑक्टोबर 2025
पृथ्वी शॉची आक्रमक खेळी- (prithvi shaw batting)
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने 220 चेंडूत 181 धावा केल्या. पृथ्वी शॉने 21 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या शानदार खेळीमुळे महाराष्ट्राने 305 धावांची मोठी भागीदारी केली. अर्शीन कुलकर्णीनेही 140 चेंडूत 186 धावा केल्या, ज्यात 33 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
पृथ्वी शॉचा महाराष्ट्राच्या रणजी संघातून खेळण्याचा निर्णय- (Prithvi Shaw decision to play for Maharashtra Ranji team)
पृथ्वी शॉने भारतासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. सध्या पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान मिळत नाहीय. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी थोडीशी घसरली. त्यानंतर, पृथ्वी शॉला मुंबई रणजी संघातूनही स्थान गमवावे लागले. यानंतर पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनची परवानगी घेत महाराष्ट्र क्रिकेट ओसोसिएशनच्या रणजी संघातून खेळण्याचा निर्णय घेतला.
पृथ्वी शॉच्या नावावर 13 शतके आणि 4500 हून अधिक धावा- (Prithvi Shaw career)
पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉच्या नावावर 13 शतके आणि 4500 हून अधिक धावा आहेत.
संबंधित बातमी:
Prithvi Shaw: पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील; भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा निर्णय
आणखी वाचा
Comments are closed.