ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारतीय वायूदलाची विमानं पाडली, भारताचा पराभव झाला ह
भारत विरुद्ध पाक युद्धावर पृथ्वीराज चव्हाण पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरु केली होती. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) पहिल्या दिवशी म्हणजे 7 मे 2025 रोजी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण) यांनी केला. 7 तारखेला जे हवाई युद्ध झाले, ते अर्ध्या तासाचे झाले. पहिल्या दिवशी आपला पूर्ण पराभव झाला होता. कोणी मान्य करो अथवा न करो. पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारताची विमानं पाडली. त्यानंतर भारताचा संपूर्ण एअरफोर्स (Indian Airforce) ग्राऊंड झाला. त्यानंतर भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही. भारतीय वायूदलाचे विमान कुठेही उडाले तर… ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरुन एकही विमान उडाले नाही. कारण त्याठिकाणी पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर भाजपसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
पुणे, महाराष्ट्र: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, “पहिल्याच दिवशी आम्हाला पूर्ण पराभवाला सामोरे जावे लागले. 7 तारखेला केवळ अर्धा तास चाललेल्या हवाई युद्धात आमचा पूर्ण पराभव झाला, हे कोणी मान्य करो किंवा न करो. त्या दिवशी भारतीय विमानांवर गोळीबार झाला… pic.twitter.com/fmSGYYfXzF
— IANS (@ians_india) १६ डिसेंबर २०२५
याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी यावर नंतर सविस्तर बोलेन, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठी: एकनाथ शिंदेंकडून पृथ्वीराज चव्हाणांवर आगपाखड
भारताचा युद्धात पराभव झाला, असं बोलणाऱ्यांना पाकिस्तानचा विजय हवा आहे का? हे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात, हे कसले भारतीय? ही कसली राष्ट्रभक्ती, हा तर देशद्रोह आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. अशाप्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांचा मी निषेध करतो. राहुल गांधीही अनेकदा ऑपरेशन सिंदूरचा हिशेब विचारतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये किती ड्रोन पडले, किती विमानं पडली, किती नुकसान झाले, असे राहुल गांधी विचारतात. पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने जी कारवाई केली, त्यामध्ये कोणत्याही नागरी वस्त्यांना धोका न पोहोचवता अचूक लक्ष्यभेद करण्यात आला. भारतीय लष्कराने ज्याप्रकारे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, त्याचा देशाला गर्व आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांना पाकिस्तानविषयी गर्व वाटत आहे. जनता त्यांना धडा शिकवेल. पाकिस्तानचे गुणगान करणे, हा देशद्रोह आहे. मोदींजींची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची कबर या देशातील जनता खोदेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
#पाहा | पुणे | ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, “मी माफी का मागू? हा प्रश्नच नाही. संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे…” pic.twitter.com/Idnp7nL63M
— ANI (@ANI) १७ डिसेंबर २०२५
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.