मोठी बातमी: जयकुमार गोरेंविरोधात विधानसभेत आज हक्कभंग आणणार, रोहित पवार म्हणाले, ‘स्वत:ला वाचवण
रोहित पवार: स्वतःला वाचवण्यासाठी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) विधानसभेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलंय .गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिल्याचा ही रोहित पवार म्हणालेत .ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर 2017 ला एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता . सध्या विधानसभेच्या अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे . विधानसभेत हे सर्व आरोप फेटाळून लावत केलेल्या वक्तव्यामुळे जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष आणि सर्व आमदारांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय .हा हक्क भंग एका महिलेवर झालेल्या अन्यायावरून आणल्याचेही त्यांनी म्हटलंय . (Rohit Pawar)
काय म्हणाले रोहित पवार?
‘आजच्या दिवशी अध्यक्ष महोदय,विधानसभा तसेच विधानसभेचे सचिव या दोघांनाही मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आज हक्कभंग आणणार आहे . हा हक्कभंग आणत असताना गोरे यांनी माझ्याविरोधात जे काही सांगितलं त्याबाबत हक्कभंग नाही, त्याला उत्तर मी दिलंच .त्यासाठी मी कुठेही लढायला तयार आहे .कोर्टाच्या ऑर्डर व तसेच तिथे असलेल्या न्यायमूर्तींनी या केसच्याबाबत सांगितलं आहे हे सगळं मी सांगू शकतो . जयकुमार गोरे यांनी जिथे सामान्यांचे प्रश्न मांडले जातात तिथं गोरेंनी अध्यक्ष व आमदारांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली .खोटी माहिती एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत होती .आम्ही लढतोय महिलेला न्याय देण्यासाठी .ते स्वतःला वाचवण्यासाठी विधानसभेत दिशाभूल करत आहेत .अध्यक्ष आणि विधानसभेचा महत्त्वाचा वेळ वाया घालवल्यामुळे हा हक्कभंग आणत आहे . असे रोहित पवार म्हणाले.
हक्कभंग स्विकारला नाही तर माध्यमांशी बोलेन
‘मी वाट बघत होतो माझ्या विरोधात दाखल झालेल्या हक्कभंगाची नोटीस मला मिळेल .आपण दुर्दैवाने तशी कमिटीच झाली नसल्याचं समजते . मी अध्यक्ष्यांना विनंती करणार आहे, ज्या हाऊस मध्ये कोणाचेही सरकार आलं तरी संविधान जपले गेले पाहिजे. हक्क जपला गेला पाहिजे .सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचा आणि मंत्र्याचा हक्कभंग मांडण्याची संधी तिथे दिली गेली पाहिजे, ज्यामधून एका महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन .कोर्टाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत .अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोलेन असेही रोहित पवार म्हणाले . माझा हक्कभंग स्वीकार होतो की नाही हे बघायचं आहे .जर हक्कभंग स्वीकारला गेला नाही, तर माध्यमांसमोर थेट बोलेन असेही रोहित पवार म्हणाले .
अधिक पाहा..
Comments are closed.