भारतात आयर्न डोम इंटरसेप्टर्सचे उत्पादन
इस्रायलची रफाएलकडून विचार : भारत सरकारच्या संपर्कात कंपनी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इस्रायलची संरक्षण कंपनी रफाएल भारतात आयरन डोम इंटरसेप्टर उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करत आहे. उत्पादनासाठी आवश्यक प्रकल्प देशात स्थापन करण्यासाठी कंपनी भारत सरकारसोबत संपर्कात आहे.
रफाएल सध्या उत्तर इस्रायलमध्ये स्वत:च्या एका प्रकल्पात आयरन डोमच्या इंटरसेप्टरचे उत्पादन करते. मागील वर्षी अमेरिकेत रेथियॉनसोबत भागीदारीत एक क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पही सुरू झाला होता. अमेरिकेतील प्रकल्प मरीनसोबत नव्या हवाई सुरक्षा प्रणालीसाठी इंटरसेप्टरचा पुरवठा करणार आहे. भारताने स्वत:चे वायुदल, नौदल आणि सैन्यासाठी इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजची बरॅक 8 हवाई सुरक्षा प्रणाली अब्जावधी रुपयांमध्ये खरेदी केली होती. तर भारताने कमी पल्ल्यासाठी देशांतर्गत हवाई सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे.
भारतातील उत्पादनाचे लाभ
भारतात आयरन डोमच्या इंटरसेप्टरचे उत्पादन केल्यास रफाएल कंपनीला अतिरिक्त देशांमध्ये विक्री करण्यास मदत मिळू शकते. यामुळे खर्च कमी होत अन्य उत्पादन प्रकल्पांना आवश्यकता भासल्यास अतिरिक्त बॅकअप प्राप्त होणार आहे. तसेच भारतीय संरक्षण क्षेत्रात कंपनीची स्थितीही मजबूत होऊ शकते. तसेच थेट इस्रायलकडून खरेदी करू न शकणारे देश भारतात निर्मित प्रणाली खरेदीचा मार्ग अवलंबू शकतात. तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मजबुती प्राप्त होणार आहे.
ड्रोन उत्पादन अन् आयरन डोमचा वापर
एल्बिट कंपनी भारतात हर्मेस 900 ड्रोन (वायुदलात ‘स्टार’ नावाने ओळखले जाणारा) आणि हर्मेस 450 (ज्याला ‘जिक’ म्हटले जाते)ची निर्मिती करते. एल्बिटने अलिकडेच वायुदलाच्या अतिरिक्त स्टार स्क्वाड्रनसाठी घटकही उपलब्ध करविले आहेत. इस्रायलच्या ऑपरेशन रोरिंग लायनदरम्यान आयरन डोमचा वापर वाढला आहे. इस्रायल आणि आखाती देशांवर इराणच्या क्षेपणास्त्र अन् ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी आयरन डोमचा वापर करण्यात आला आहे.
Comments are closed.