प्राध्यापक-खासदार अकोइजाम बडतर्फ

11 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी दोषी : ‘जेएनयू’च्या अंतर्गत समितीच्या शिफारशीनुसार कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) प्राध्यापक आणि इनर मणिपूरचे काँग्रेस लोकसभा खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना बडतर्फ केले आहे. विद्यापीठाने त्यांना विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. ही बडतर्फी तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने (आयसी) केलेल्या चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अंतर्गत समितीने बिमोल अकोइजाम यांना मोठी शिक्षा देण्याची शिफारस केली होती.

अकोइजाम यांना पदावरून दूर करण्याची कारवाई करण्यापूर्वी दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) याप्रकरणी जेएनयू प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. आयोगाने 11 विद्यार्थिनींच्या आरोपांच्या आधारे सप्टेंबरमध्ये हा अहवाल मागवला होता. विद्यार्थिनींनी मे 2026 मध्ये जेएनयूचे कुलगुरू शांतीश्री धुलिपुडी पंडित यांच्याकडे प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्या तक्रारीवर योग्य कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

Comments are closed.