सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा भोवला, खेळतांना चिमुकली 15 फूट खोल पडली अन्…

पुणे वाकड अपघाताच्या बातम्या : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक अतिशय धक्कादेणारा बातमी समोर आली आहे. वाकड येथील पिंक सिटी रोडवर असलेल्या अस्वानी गॅलक्सी सोसायटीमध्ये खेळत असताना एका चिमुकलीचा दुर्दैवी अपघात झाला आहे. सुरक्षेअभावी एका 3 वर्षीय बालिकेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत बिल्डर आणि पार्किंग सिस्टमच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad Accident News : बिल्डर आणि पार्किंग सिस्टमच्या संचालकावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 च्या सुमारास अस्वानी गॅलक्सी सोसायटीच्या गार्डनमध्ये श्रीजा अनिल सांगळे (वय 3 वर्षे 9 महिने) ही चिमुकली इतर मुलांसोबत खेळत होती. या गार्डनच्या अगदी जवळच एफ विंगचे पार्किंग पिट खड्डा आहे. मात्र, या खड्ड्याला कोणतीही संरक्षक भिंत, कठडा किंवा साधी जाळी देखील लावलेली नव्हती. खेळण्याच्या ओघात श्रीजा या अर्धवट बांधकाम असलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यानमुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अस्वानी पॅराडाईज कंपनीचे बिल्डर आणि किंग मल्टीलेव्हल कार पार्किंग सिस्टमचे संचालक जगन्नाथ राऊत यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. फक्त या कमीनंतर पालकांमध्ये राग दिसून आलाय.

Pune Crime: पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, 6 जणांना अटक

पुणे पोलिसांनी राजस्थान येथे छापेमारी करत 4 कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून  जणांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी परिसरातून 12 लाख रुपयांचे 27 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. पुणे पोलिसांनी या रॅकेटचा तपास करायला सुरुवात केली. यामध्ये काही जणांना अटक केली आणि थेट राजस्थान येथील जोधपूर पर्यंत त्यांचे धागेदोरे असल्याचं तपासातून समोर आलं. त्यानुसार पुणे पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथील जोधपूर येथे छापेमारी करत या रॅकेट चा म्होरक्या रामकरण जाट याला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी पुण्यात सुद्धा विविध ठिकाणाहून आरोपींना जेरबंद करत एकूण 1 किलो 960 ग्रॅम एम डी अमली पदार्थ जप्त करत एकूण 6 जणांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ या आरोपींनी किती जणांना विकले आहे आणि याची खरेदी करणारे कोण आहेत याचा तपास सुरू आहे.

इतर महत्त्वच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.